1st to 8th CCE result (अ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation) (विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन) सर्व शिक्षकांनी खालील साधने-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्याथ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात. १) दैनंदिन निरीक्षण. २) तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी) ३) प्रात्यक्षिके / प्रयोग. ४) उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे) ५) प्रकल्प ६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (open book test) ७) स्वाध्याय / वर्गकार्य (माहिती लेखन, वर्णन लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन, कथा लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन व कल्पना विस्तार इत्यादी) ८) इतर : प्रश्नावली. सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने ब) संकलित मूल्यमापन संकल...
Wow
ReplyDeleteWow
ReplyDeleteAmazing I got 90%
DeleteCongratulations... Keep readin...EnjoyLearning..
Delete