Document
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
vishay: मराठी - १ ली ते ८ वी - वर्णनात्मक नोंद
Subject: Marathi
- ऐकलेल्या गोष्टींविषयी (गोष्ट, कविता इत्यादी) गप्पा मारतात. आपले मत व्यक्त करतात, प्रश्न विचारतात.
- भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्दांशी खेळण्याचा आनंद घेतात. उदा. भिंगरी, झिंगरी इत्यादी.
- लिखित साहित्य आणि चित्र स्वरूपातील साहित्य (उदा. चित्र, आलेख इत्यादी) यांतील फरक सांगू शकतात.
- चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात.
- चित्रातील वा चित्रमालिकांतील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, कृती आणि पात्र यांना एकसंघपणे पाहून त्यांचे कौतुक करतात.
- वाचलेल्या गोष्टी, कविता यांतील अक्षरे/शब्द/वाक्ये इत्यादी पाहून आणि त्यांचे ध्वनी ऐकून, समजून ओळखतात.
- पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना (उदा. स्थानिक सामाजिक घटना, कार्यक्रम) यांविषयी न अडखळता बोलतात आणि प्रश्न विचारतात.
- पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टी/घटना/मुद्दे यांना स्वत:च्या भाषेत कथन करतात, लिहितात. उदा. अपूर्ण गोष्ट पूर्ण करणे.
- रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, इंटरनेट यांद्वारे पाहिलेल्या, ऐकलेल्या घटना स्वत:च्या शब्दांत मांडतात.
- आपल्या परिसरातील विभिन्न लोककथांना आणि लोकगीतांना जाणून घेऊन त्यांबद्दल चर्चा करतात.
- स्वत:पेक्षा भिन्न असलेल्या भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी, राहण्याच्या सवयी यांतील विविधतेविषयी चर्चा करतात.
- ढोबळमानाने पाठ्यघटक वाचून त्यातील विशेष मुद्द्यांचा शोध घेतात. अनुमान व निष्कर्ष काढतात.
- वाचलेल्या पाठ्यविषयाचे सूक्ष्म वाचन करून त्यातील वैशिष्ट्य शोधतात, अनुमान व निष्कर्ष काढतात.
- वाचलेल्या साहित्यावर चिंतन करून अधिक आकलनासाठी प्रश्न विचारतात.
- स्वत:च्या परिसरातील लोककथा आणि लोकगीते यांविषयी माहिती सांगतात.
- विषयाचे चिंतन करून त्यातील सार शोधतात, आशय सांगतात, टिपणी काढतात, महत्त्वाचे मुद्देशोधतात, वर्गीकरण करतात.
- वाचलेल्या साहित्यातील नवीन शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा आस्वाद घेतात.
- वाचक आणि लेखन यांचा उद्देश लक्षात घेऊन स्वत:चे मत प्रभावीपणे लिहितात.
- अपरिचित परिस्थिती आणि घटना यांची कल्पना करतात आणि त्याविषयी मनात निर्माण होणारे विचार व कल्पना लेखी व ब्रेल लिपीत अभिव्यक्त करतात.
- भाषेतील बारकावे, नियम यांचा लेखनात उपयोग करतात. उदा. कवितेतील शब्द बदलून अर्थ आणि लय समजून घेतात.
Comments
Post a Comment
Write us your question, suggestions, experience etc