Document
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
विषय : सामाजिकशास्त्र - ५ वी थी ते ८ वी - वर्णनात्मक नोंद
Subject: Social Science
- तारे, ग्रह आणि उपग्रह उदा., सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील फरक ओळखतो.
- पृथ्वीच्या विभिन्न आवरणांमुळे विशेषतः जीवावरणामुळे, जीवनाच्या अस्तित्वामुळे, पृथ्वी एक अद्वितीय खगोलीय पिंड आहे, हे ओळखतो.
- सपाट पृष्ठभागावर दिशा आणि जगाच्या नकाशावर खंड आणि महासागर दाखवतो.
- अक्षवृत्त आणि रेखावृत्त ओळखता येतात उदा., ध्रुव, विषुववृत्त, कटिबंध; भारतातील राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि शेजारील इतर देश पृथ्वीगोलावर आणि नकाशावर दाखवता येतात.
- भारतातील पर्वत, पठार, मैदानी, वाळवंट, नद्या इत्यादी भौतिक वैशिष्ट्ये भारताच्या नकाशावर दाखवता येतात.
- पारंपरिक चिन्हांच्या मदतीने प्रमाण, दिशा आणि भूरूपे दाखवून भोवतालच्या प्रदेशाचा नकाशा तयार करू शकतो.
- ग्रहणसंबंधी अंधश्रद्धेचे चिकित्सकपणे परीक्षण करतो.
- इतिहासाची विविध साधने ओळखतात. (पुरातत्त्वशास्त्रीय, साहित्यिक/लिखित) आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात.
- भारताच्या नकाशावर महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे स्थान दर्शवतात.
- आद्य मानवी संस्कृतीची विशिष्ट वैशिष्ट्ये ओळखतात व त्यांचा विकास स्पष्ट करतात.
- महत्त्वाची राज्ये, राजघराणी यांचे लक्षणीय योगदान स्पष्ट करतात.
- प्राचीन काळातील व्यापक घडामोडी स्पष्ट करतो. उदा., शिकारी व अन्न गोळा करणारे हा टप्पा ते शेतीची सुरुवात.
- एका ठिकाणीच्या घडामोडीचा दुसऱ्या ठिकाणाशी संबंध जोडतात.
- पृथ्वीच्या अंतरंगातील प्रमुख थर , खडकांचे प्रकार, वातावरणाचे थर आकृतींच्या माध्यमातून ओळखतो.
- वेगवेगळ्या हवामान प्रदेशांचे वितरण आणि विस्तार जगाच्या नकाशावर किंवा पृथ्वीगोलावर दाखवतो.
- भूकंप, पूर, दुष्काळ, इत्यादी आपत्तींच्या स्थितीत करायच्या प्रतिबंधात्म विविध घटक / घटनांमुळे भूरूपांची निर्मिती होते, हे सांगतो.
- वातावरणाची घडणरचना आणि रचना स्पष्ट करतो. पर्यावरणाचे विविध घटक आणि त्यांच्यातील सहसंबंधांचे वर्णन करतो.
- परिसरातील प्रदूषणास कारणीभूत घटकांचे विश्लेषण करतो आणि ते टाळण्यासाठी विविध उपाय सांगू शकतो.
- प्रदेशात वनस्पती आणि प्राणी यांच्यातील विविधतेशी संबंधित घटकांची कारणे सांगू शकतो उदा. हवामान, भूरूपे, इत्यादी.
- नैसर्गिक आपत्ती आणि दुःखद घटना संबंधित चिंतन करतो.
- हवा, पाणी, ऊर्जा, वनस्पती आणि प्राणी, इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाविषयी संवेदनशीलता दर्शवितो.
- हवामान आणि जीवन यांच्यातील अंतरसंबंध वेगवेगळ्या हवामान प्रदेश व त्यामध्ये राहाणाऱ्या लोकांचे जीवन यांमधील परस्पर संबंध सांगतो.
- विशिष्ट प्रदेशाच्या विकासावर प्रभावित करणाऱ्या घटकांचे विश्लेषण करतो.
Comments
Post a Comment
Write us your question, suggestions, experience etc