Document
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
विषय : विज्ञान - ५ वी थी ते ८ वी - वर्णनात्मक नोंद
Subject: Science
- स्वरूप, स्पर्श, कार्य, गंध इ. यांच्या निरीक्षणक्षम गुणधर्मांच्या आधारे फुले, वनस्पती, जस तंतू इ. असे सजीव ओळखतो.
- गुणधर्म, रचना व कार्य यांच्या आधारे तंतु व धागा, सोटमूळ व तंतुमय मूळ, वाहक व विसंवाहक असे पदार्थांमधील व सजीवांमधील फरक सांगतो.
- प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठ साध्या शोधक पद्धतींचा वापर करतो. उदा. प्राण्यांच्या खाद्यामध्ये कोणकोणती पोषकद्रव्ये असतात? सर्व भौतिक बदल परिवर्तनीय असतात का? मुक्तपणे टांगलेला चुंबक एखादया विशिष्ट दिशेने स्थिर होतो का?
- प्रक्रिया व घडामोडींचा त्यांच्या कारणांशी संबंध जोडतो. उदा. अभावजन्य रोगांचा आहारशी संबंध; प्राणी व वनस्पतींचा अनुकूलनांचा अधिवासाशी संबंध; हवेच्या गुणवत्तेचा प्रदूषकांशी संबंध
- प्रक्रिया व घडामोडींचे स्पष्टिकरण देतो : उदा. वनस्पती तंतूवरील प्रक्रिया ; प्राणी व वनस्पतींतील हालचाली; छायानिर्मिती; सपाट आरशावरून प्रकाशाचे परावर्तन हवेच्या घटनेमध्येहोणारे बदल; गांडूळखताची निर्मिती.
- भौतिक राशींचे मापन करतो व SI एककांमध्ये व्यक्त करतो. सजीव व प्रक्रियांचे नामनिर्देशन आकृत्या/ओघतक्ते काढणे. उदा. फुलाचे भाग; सांधे; गाळन क्रिया; जलचक्र इ.
- स्वरूप, स्पर्श, कार्य, इत्यादींच्या निरीक्षणक्षम गुणधर्मांच्या आधारे पदार्थव सजीव ओळखतो. उदा. प्राणीजन्य तंतू, दातांचे प्रकार, आरसे व भिंग इ.
- गुणधर्म रचना कार्य यांच्या आधारे पदार्थांमधील व सजीवांमधील फरक सांगतो. उदा. विविध सजीवांतील पचन; एकलिंगी व व्दीलिंगी फुले; उष्णतांचे सुवाहक व दुर्वाहक; आम्लधर्मी आम्लारीधर्मी व उदासीन पदार्थ;
- आरसे व भिंगे यांमुळे तयार होणारया प्रतिमा इ.
- गुणधर्म/लक्षणांच्या आधारे पदार्थांचे व सजीवांचे वर्गीकरण करतो. उदा. वनस्पतीजन्य व प्राणिजन्य तंतू, भौतिक व रासायनिक बदल.
- प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या शोघक पद्धतींचा वापर करतो. उदा. रंगीत फुलांच्या अर्काचा उपयोग आम्ल आम्लारी दर्शक म्हणुन होऊ शकेल का? हिरव्यारंगा व्यतिरिक्ताची पाने प्रकाश संश्लेषण करतील का? पांढरा प्रकाश हा विविध रंगांचे मिश्रण आहे का?
- प्रक्रिया व घडामोडींचा त्यांच्या कारणांशी संबंध जोडतो. उदा. हवेच्या दाबाचा वाऱ्याच्या वेगाशी संबंध; पाण्याच्या पातळीचे कमी होण्याचा मानवी कृतींशी संबंध
- प्रक्रिया व घडामोडींचे स्पष्टीकरण देतो. उद. प्रतिजन्य तंतूवरील प्रक्रिया; उष्णता स्थानांतरणांचे प्रकार मानव व वनस्पतींमधील इंद्रिय व इंद्रिय संस्था, विदयुत धारेचे औष्णिक व चुंबकीय परिणाम.
- रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक समीकरणे मांडतो. उदा. आम्ल-आम्लारी अभिक्रिया, क्षरण, प्रकाश संश्लेषण, श्वसन इ.
- मापन व गणन करतो. उदा. तापमान, नाडी ठोक्यांचा दर; गतिमान वस्तूची चाल, साध्या दोलकाचा आंदोलन काल इ.
- गुणधर्म, रचना व कार्य यांनुसार सजीव व पदार्थ यांतील फरक सांगतो. उदा. नैसर्गिक व मानव निर्मित धागे, स्पर्शी व अस्पर्शी बले, विद्युत सुवाहक व दुर्वाहक द्रव, प्राणी व वनस्पती पेशी, प्राणीज व अंडज प्राणी.
- प्रक्रिया व घडामोडींचा त्यांच्या कारणांशी संबंध जोडतो उदा. हवेतील प्रदूषके व धूर तयार होणे, आम्लवर्षाचा ऐतिहासिक वास्तूंवर होणारा परिणाम
- प्रक्रिया व घडामोडींचे स्पष्टीकरण देतो. उदा. मानव व प्राणी यांतील पुनरूत्पादन, ध्वनीची निर्मिती व संक्रमण, विद्युत धारेचे रासायनिक परिणाम, गुणित प्रतिमांची निर्मित ज्योतीची रचना इ.
- नामनिर्देशीत आकृत्या व ओघतक्ते काढतो. उदा. पेशी, मानवी डोळा, मानवी प्रजनन संस्था व प्रयोगांची मांडणी. परिसरात मिळणारे साहित्य वापरून प्रतिकृती तयार करतो.
Comments
Post a Comment
Write us your question, suggestions, experience etc