Document
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
पर्यावरण अभ्यास -३ री ते ५ वी - वर्णनात्मक नोंद : वर्णनात्मक नोंद
Subject: EVS- Environmental Studies
- कुटुंबातील व्यक्तींसोबत आणि व्यक्तींमधील नातेसंबंध ओळखतात.
- असे घटक/गुणधर्म समजण्यासाठीच्या कृतींचे गट तयार करतात.
- वस्तूंचे, साहित्य, त्याचप्रमाणे आकार, चव, रंग, पात, आवाज, गुणवैशिष्ट्ये भूप्रदेश, हवामान, संसाधने (अन्न, पाणी, निवारा, उदरनिर्वाह) व सांस्कृतिक जीवन (उदा., अतिदूर/दुर्गम प्रदेशातील, थंड/उष्ण वाळवंटातील लोकांचे जीवन) यांमधील दुवे विशद करतात.
- कुटुंबातील व्यक्तींच्या भूमिका, कुटुंबाचा प्रभाव (गुणवैशिष्ट्ये/ वैशिष्ट्ये/ सवयी/ पद्धती), सोबत राहण्याची गरज, विभिन्न प्रकारांनी स्पष्ट करतात.
- विविध वयोगटातील लोकांच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील आणि घरातील पाण्याच्या उपयोगाचे वर्णन करू शकतो.
- वस्तू, पक्षी, प्राणी, वैशिष्ट्ये, उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात.
- वर्तमानकालीन व भूतकाळातील (वडिलधाऱ्यांच्या काळातील) वस्तू/कृती यांच्यातील भेद स्पष्ट करतात. (उदा. कपडे/भांडी/खेळले जाणारे खेळ/लोकांची कार्ये) इत्यादी.
- लगतच्या परिसरातील फुले, मुळे, फळे यांचे (आकार, रंग आणि गंध तसेच कोठे वाढतात व तत्सम) सामान्य वैशिष्ट्ये ओळखतात आणि पक्षी आणि प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये ओळख जसे की, चोच / दात, पंजे, कान, केस , घरटे/निवारा इत्यादी.
- विस्तरित कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नाते संबंध ओळखतात.
- प्राण्यांचे समूह व समूहांतर्गत वर्तन (उदा. मुंग्या, मधमाशी, हत्ती, पक्ष्यांचे वर्तन (घरटी)) विशद करतात. कुटुंबातील बदल (उदा. जन्म, लग्न, बदली इत्यादीमुळे होणारे बदल) स्पष्ट करतात.
- दैनंदिन जीवनातील कौशल्याधारित कामे (शेती, बांधकाम, कला / हस्तकला) त्यांचा वडीलधाऱ्यांकडून मिळणारा वारसा व प्रशिक्षण (संस्थांची भूमिका) यांचे वर्णन करतात.
- स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या निर्मिती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात. (उदा. अन्न, पाणी, वस्त्र).
- भूतकाळातील आणि सध्याच्या वस्तू आणि कृती यांमधील फरक सांगतात. (उदा. परिवहन, चलन, घरे, साहित्य, साधने कौशल्ये इत्यादी)
- प्राणी, पक्षी, वनस्पती, वस्तू, टाकाऊ पदार्थ सामग्री यांचे गट तयार करतात. (उदा. दृश्य स्वरूप, गुणविशेष, वापर इत्यादी).
- प्रमाणित व स्थानिक एककांमध्ये (किलो गज, पाव इत्यादी) गुणधर्म, इत्यादींचा अंदाज बांधतो, अवकाशीय राशींचा (लांबी, वजन, वेळ, कालावधी इत्यादी) अंदाज घेतो तसेच सामान्य साधने वापरून सत्यता पडताळतो.
- प्राण्यांमधील असाधारण क्षमता (दृष्टी, गंध, ऐकणे, निद्रा, आवाज इ.) व त्यांचे प्रकाश, आवाज व अन्न यांना प्रतिसाद स्पष्ट करतात.
- प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्त्वाचे वर्णन करतात. (उदा.,- प्राण्यांवर आधारित चरितार्थ असणारे समाज, बीजसंक्रमण इत्यादी)
- भूतकाळातील व वर्तमानातील चालीरिती प्रथा, तंत्रे यांच्यातील बदलांचा (नाणी, चित्रे, स्मारके, वस्तू संग्रहालये, इत्यादी.) तसेच ज्येष्ठांशी संवाद यामधून मागोवा घेतात.
Comments
Post a Comment
Write us your question, suggestions, experience etc