1st to 8th Result Prepration
(अ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)
(विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन)
सर्व शिक्षकांनी खालील साधने-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्याथ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.
१) दैनंदिन निरीक्षण.
२) तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी)
३) प्रात्यक्षिके / प्रयोग.
४) उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे)
५) प्रकल्प
६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (open book test)
७) स्वाध्याय / वर्गकार्य (माहिती लेखन, वर्णन लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन, कथा लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन व कल्पना विस्तार इत्यादी)
८) इतर : प्रश्नावली. सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने
ब) संकलित मूल्यमापन
संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरुपात करण्यात यावे. लेखी स्वरुपातील साधनांमध्ये मुक्तोत्तरी प्रश्नांचा (open ended questions) अधिक वापर करण्यात यावा. संविधानातील मूल्ये, गाभाघटक, जीवन कौशल्ये व दूरगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा.
पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी प्रात्यक्षिक वर्ग स्तरावर शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे.
श्रेणी पद्धतीचा वापर (Grading System)
विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगतीपत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांवरुन खालील कोष्टकात दर्शविल्यानुसार श्रेणीमध्ये लिहावी.
सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये.
Grading Table
Marks | Grade |
---|---|
91 to 100 | A1 |
81 to 90 | A2 |
71 to 80 | B1 |
61 to 70 | B2 |
51 to 60 | C1 |
41 to 50 | C2 |
33 to 40 | D |
21 to 32 | E1 |
20 and below | E2 |
वर्णनात्मक फलित नोंद
* विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकात शैक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक फलित नोंदवावे. तसेच त्यामध्ये वैयक्तिक गुणांची (Quality) नोंद करावी. मूल्यमापन करताना सकारात्मक शेयांचा वापर करावा. तसेच इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नये. पालकांना मुलांच्या प्रगतीबाबत वेळच्यावेळी माहिती द्यावी.
Aslo read : वर्णनात्मक फलित नोंद (उर्दू माध्यम)
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक नोंद (मराठी माध्यम )
अनुपस्थित राहतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन
* जे विद्यार्थी मूल्यमापनाच्यावेळी अनुपस्थित राहतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन करण्यात यावे.
विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही.
* सर्व विद्यार्थी वरच्या श्रेणीकडे वाटचाल करतील यासाठी शाळा व शिक्षकांनी प्रयत्नशील
रहावे.
विशेष करुन 'ड' व त्याखालील श्रेणीतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन
करुन किमान 'क २' श्रेणी पर्यंत आणणे हे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र
अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही.
Very useful
ReplyDeleteThanks sir for the pleasant comment...
ReplyDeleteKeep visiting... Enjoy learning...